loader image

ताण आणि वंधत्वाचे दुष्टचक्र | Stress & infertility are interlinked

चरक संहितेत चरक ऋषींनी एक सुत्र दिले आहे.
“सौमनस्य गर्भधान नाम अग्रम्”
प्रेग्नन्सी राहण्यासाठी आणि टिकण्यासाठी आवश्यक गोष्टींचा अग्रक्रम लावला तर सर्वात अग्रस्थानी सौमनस्य येते असे चरक ऋषींनी या सुत्रात सांगितले आहे. सौमनस्य म्हणजे त्या जोडप्याचे खासकरून त्या स्रीचे आनंदी, समाधानी आणि शांत मन.

आमच्या ॲलोपथीनेही आज हे सुत्र १००% बरोबर असल्याचे मान्य केले आहे. प्रेग्नन्सी राहणे हा हॉर्मोन्सचा खेळ आहे. हॉर्मोन्सचा कंट्रोल हा केवळ हॉर्मोन्सचा कंट्रोल नसून तो न्युरो-हॉर्मोनल कंट्रोल असतो असे आजाचे वैद्यकशास्र मानते. कारण मानवी मेंदु आणि हॉर्मोन्सला नियंत्रित करणारी यंत्रणा एकमेकांना जोडलेल्या असतात. 

मेंदूच्या खालच्या भागात भावनांना निर्माण आणि नियंत्रित करणारी “लिंबिक सिस्टिम” असते. त्यातील आठ सेंटर पैकी “हायपोथॕलामस” हे सेंटर ‘पिच्युटरी ग्रंथी’ला जोडलेले असते. या पिच्युटरी ग्रथीला ‘ग्रंथीराज’ आसे म्हटले जाते. शरीरातील सर्व हॉर्मोन तयार करणाऱ्या ग्रंथींचे नियंत्रण ही ग्रंथीराज करते.

मेंदूचा भाग असलेले हायपोथॕलामस पिच्युटरी ग्रंथीतून निघणाऱ्या आठ “नियंत्रक हॉर्मोन्स” च्या पातळीवर नियंत्रण ठेवतो. हे आठ नियंत्रक हॉर्मोन्स शरीरातील सर्व हॉर्मोन्सच्या ग्रंथींच्या कामावर नियंत्रण ठेवतात.
बीजांडे सुद्धा हॉर्मोन्स तयार करणाऱ्या ग्रंथी आहेत. पिच्युटरीतून निघणारे FSH आणि LH हे हॉर्मोन्स बिजांडावर काम करून बीजे वाढवतात. बिजे वाढवण्याच्या प्रक्रियेत सेक्स हॉर्मोन्स तयार होतात. हे सेक्स हॉर्मोन्स स्री-पुरूष सहवासाची इच्छा निर्माण करतात. हेच सेक्स हॉर्मोन्स गर्भाशयाचे अस्तर देखील तयार करतात. या गर्भाशयाच्या अस्तरात गर्भ मुळ धरतो. अशा प्रकारे बिजांडात बीजे तयार होणे, शरीरसंबंधांची इच्छा निर्माण होणे, त्यातून स्री आणि पुरूष बिजे एकत्र येऊन गर्भ तयार होणे आणि गर्भाने मुळ धरण्यासाठी आवश्यक जमीन गर्भाशयात तयार होणे असे चारही कार्य पिच्युटरी ग्रंथीच्या नियंत्रणाखाली असते.

पिच्युटरी ग्रंथीचे काम हायपोथॕलमसच्या नियंत्रणाखाली असते. हायपोथॕलॕमसचे कामावर भावनिक चढउतार आणि ताणतणावाचा परिणाम होतो. अशा प्रकारे प्रजननाचे काम भावनांशी आणि ताणतणावाशी निगडीत असते. ताण वाढला की एकीकडे बीजे तयार होण्याची प्रक्रिया मंदावते तर दुसरीकडे संबंधाची इच्छा कमी होते. तसेच गर्भाशयाचे अस्तर तयार होणेही थंडावते. अशा प्रकारे तणावाखाली असलेल्या आपल्या लेकरावर प्रकृतीमाता प्रेग्नन्सीचा वाढीव ताण येऊ देत नाही.
योग्य वयात बाळ होणे प्रत्येक जोडप्यासाठी महत्वाचे असते. लग्नानंतर जसा वेळ जाऊ लागतो तसा ताण वाढत जातो. हा ताणच प्रेग्नसी राहण्याच्या मार्गात मोठा अडथळा बनतो. ताणामुळे प्रेग्नन्सी लांबली की त्यामुळे आणखी ताण निर्माण होतो. अशा प्रकारे ते जोडपे वंधत्व आणि ताणाच्या दुष्टचक्रात अडकून पडते.
लोकसंख्या विस्फोटामुळे जगण्याची स्पर्धा कठीण झाल्याने आज बहुतांश लोक ताणाखाली जगत आहेत. ज्यांना हा ताण बुद्धिमानपणे हातळता येत नाही त्यांना प्रेग्नन्सीपासून दुर ठेवून निसर्ग त्यांना प्रेग्नन्सीच्या वाढीव ताणापासून तर वाचवतोच पण त्यायोगे लोकसंख्येवरही नियंत्रण ठेवतो. जे जगण्याचा ताण समर्थपणे हातळतील त्यांचाच अनुवंश पुढील पिढीत जातो आणि टिकतो. निसर्गाच्या या तत्वालाच ‘बलिष्ठ अतिजीविता’ किंवा ‘सर्व्हावल आॕफ फिटेस्ट’ असे म्हटले जाते.

99% लोकांना ताण आहे पण 99% लोकांना ताण म्हणजे नक्की काय हे माहीत नाही. ज्या समस्येचे स्वरूपच नीट समजले नाही तर तिची कारणे कशी शोधावीत? अशा समस्येवर उपाय सापडणे तर अजूनच कठिण काम असते.
ताण म्हणजे नक्की काय हे जरी माहित नसले तरी ताणाचा निचरा कसा होते याची बहुतेकांना कल्पना असते. प्रेशर कुकरमध्ये प्रेशर वाढल्यावर कुकर फुटू नये म्हणून कुकरची शिट्टी होते. त्याच प्रमाणे मनातील ताण वाढत गेला की त्याचा निचरा चिडून किंवा रडून होतो आणि मनातील ताण तात्पुरता कमी होतो.

आता आपण ताणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू. रडणे चिडणे कशामुळे होते? मनाविरूद्ध काही घडू लागले की मनुष्याचे रडणे-चिडणे सुरू होते. पण कुठलीही गोष्ट मनाविरूद्ध घडण्याआधी मनाने ती गोष्ट तशी घडावी अशी अपेक्षा केलेली असते. मनाने तशी अपेक्षाच केली नाही तर मनाविरूद्ध घडणे अशक्य आहे. म्हणजे आपल्या ताणाच्या मुळाशी आपल्याच मनाच्या अपेक्षा असतात. मनाच्या अपेक्षा पुर्ण होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली की मनामध्ये निर्माण होणाऱ्या अगतिकतेलाच ताण असे म्हणतात.

अपेक्षा जन्माला येतात असमाधानातून!
पण मग हे असमाधान कुठून जन्माला येते?
असमाधान जन्माला येते नकारात्मक विचारसरणी मधून! आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, इ. पैकी काहीही परिपुर्ण नाही. त्यात जशा चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईट गोष्टी ही आहेत. या दोन्हींपैकी काय पहायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही सर्वांना आहे. सकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मन समाधानी होते. नकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मनात असमाधान निर्माण होते. असे असतानाही बहुतेक वेळा आपण नकारात्मक विचार करणे स्विकारतो.

याचे कारण आपल्या मेंदूतील हॕप्पी हॉर्मोन्सच्या पातळीत दडलेले असते. आपल्या मेंदूतील सेरेटोनीन, इंडॉर्फिन, आॕक्सिटोसीन आणि डोपामिन हे चार हॕप्पी हॉर्मोन्स असतात. त्यांची पातळी चांगली असेल तर सतत मनात सकारात्मक विचार येतात. मग मन जे मिळालेले आहे त्यात समाधानी होते. त्यांची पातळी घटली तर मनात आपोआप नकारात्मक विचार येऊ लागतात. मग मन असमाधानी होते.

१) रोज आठ तास झोप घ्यावी. झोपेत आपल्या सर्व हॕप्पी हॉर्मोन्स च्या बॕटरी रिचार्ज होतात.
२) झोपेच्या वेळा अजिबात बदलू नये. झोपेचे चक्र आणि हॕप्पी हॉर्मोन्स तयार करणारे रासायनिक चक्र एकमेकांशी जोडलेले असतात. झोपेचे चक्र विस्कळीत झाले तर हॕप्पी हॉर्मोन्स तयार करणारे रासायनिक चक्र पण विस्कळीत होते. यालाच जेट लॕग असे म्हटले जाते. त्यामुळे झोपायची आणि उठायची वेळ पंधरा मिनिटांपेक्षा जास्त बदलू नये.
३) उठल्यावर किमान एक तास नियमितपणे चालावे. शारीरिक मेहनतीमुळे मेंदूत इंडॉर्फिन आणि सेरेटोनीन हे हॕप्पी होर्मोन्स तयार होतात.
४) चालताना एक तास हेड फोन लावून शांत म्युझिक ऐकावे. म्युझीक ऐकले की मेंदूत डोपामिनची पातळी वाढते.
५) दररोज किमान १२ सुर्यनमस्कार करावे. सर्व हॕप्पी हॉर्मोन्सची पातळी वाढते.
६) दररोज सात प्रकारचे प्राणायाम करावेत. नाडीशोधन, भस्रिका, कपालभाती, अनुलोम-विलोम, प्राणशक्ती निरोधन प्राणायाम(कुंभक प्राणायाम), भ्रामरी, ओंकार प्राणायाम यापैकी प्रत्येक प्राणायाम किमान दोन मिनिटे करावे. सर्व हॕप्पी हॉर्मोन्सची पातळी वाढते.
७) कामाव्यतिरिक्त असणारा स्क्रिन टाईम एक तासापेक्षा कमी ठेवावा. भावनिक चडउतार असलेले व्हिडिओ खुप वेळ पाहिले तर हॕप्पी हॉर्मोन्सच्या बॕटरी डिस्चार्ज होतात.
८) सर्व सकारात्मक गोष्टी अपेक्षित आसत्याने दुर्लक्षिल्या जातात. आउलट सर्व नकारात्मक गोष्टी अनपेक्षित असल्याने मनासाठी धक्कादायक असतात. आपल्या वाट्याला आलेल्या चांगल्या-वाईट गोष्टींपैकी फक्त सकारात्मक गोष्टी प्रयत्नपुर्वक शोधून शोधून पहाव्यात. तसेच धक्कादायकपणे समोर येणाऱ्या नकारात्मक गोष्टींकडे गांधीजींच्या तीन स्मार्ट माकडांप्रमाणे दुर्लक्ष करावे.
९) आठवाड्यातून किमान तीन वेळा शरीर संबंध ठेवावेत. शरीरसंबंधात आॕक्सिटोसीन हे हॕप्पी होर्मोन तयार होते. प्रत्येक महिन्यात एकच स्रीबीज बाहेर पडते. ते बाहेर पडायचा दिवस पाळीच्या चौदाव्या दिवसाच्या दहा दिवस मागे किंवा पुढे जाऊ शकतो. स्रीबीज बाहेर पडल्यावर फक्त २४ तास जिवंत राहते. त्याची आणि पुरूषबीजाची चुकामुक झाल्यास गर्भ तयार होण्याची शक्यता शुन्य होते. त्यामुळे आठवाड्यातून किमान तीन वेळा शरीर संबंध ठेवावेत. शरीरसंबंधाआधी स्रीने कुल्यांखाली जाड उशी घ्यावी. संबंधानंतर ती उशी तशीच ठेवून दोन तास तसेच झोपून रहावे. या स्थितीत दोन तास राहिल्याने वीर्य गर्भाशयाच्या तोंडाशी दोन तास जमा राहते आणि निरोगी शुक्रजंतूंना गर्भाशयात प्रवेश करण्याची संधी मिळते. शुक्रजंतू गर्भाशयात दोन ते तीन दिवस जिवंत राहू शकत असल्याने आठवड्यातून तीन संबंध विखरून आले तर कुठल्याही क्षणी शुक्रजंतू गर्भाशयात स्रीबीजाची वाट पाहत थांबलेले असतात. स्रिबिजाची आणि पुरूषबीजाची चुकामुक होण्याची शक्यता कमी होते.
१०) एवढे सर्व करूनही एखाद्या व्यक्तीची अती चिडचिड वा रडारड होत असेल तर डॉक्टरी सल्ल्याने हॕप्पी हॉर्मोन्सची पातळी वाढवणारी औषधे घ्यावीत.
११) वरील सर्व उपाय नियमितपणे वर्षभर करूनही प्रेग्नन्सी राहिली नाही तर चांगल्य वंधत्वतज्ञाला दाखवून पुढील तपासण्या आणि उपचार करून घ्यावेत.

At City Fertility Centre, our main goal is to achieve pregnancy in every patient and provide holistic care till the delivery of the baby. Holistic fertility is an approach to male and female infertility issues that considers the mind, spirit, body, emotions and lifestyle factors as key to maximizing one’s natural fertility. Holistic fertility involves ayurveda, yoga, allopathy and meditational aid in natural fertility or fertility treatments.

Dr. Gopalkrishna Gawade is one of the top fertility expert doctor in Pune.

At City Fertility Centre, with experienced staff of fertility expert doctors, skilled embryologists & nursing staff with state-of-the-art IVF lab, we provide best infertility treatment in Pune with transparent & ethical practice at affordable rates. To book appointment with Dr. Gopalkrishna Gawade. Call us at +91-8669993336.
डॉ गोपालकृष्ण गावडे.
वंधत्वतज्ञ आणि लॕपरोस्कोपीक सर्जन
सिटी फर्टिलिटी सेंटर
पाटील हॉस्पिटल
सिंहगड रोड
पुणे
9766325050

Contact Detail

Address

Survey No 28, Patil Hospital, Sinhagad Road, Anand Nagar, Pune, Maharashtra 411051

Phone

+91 86699 93336

Subscribe To Our Channel

IVFs procedures
0 +
Surgeries
0 +
Deliveries
0 +

Our Services

We provide comprehensive care for women of all ages. Right form the reproductive issues to post-menopausal gynecologic problems, every treatment related to female reproductive organs are provided here.

What People Say
About Us

Pallavi M

We got this reference through one of my friend, with full faith we visited the clinic for consultation. We had already taken consultation and treatment from many renowned gynecologist in Pune. Dr. Gopalkrishna Gawade Sir made us feel confident and comfortable in the first visit itself. He explained us the procedure and line of treatment.

Pooja Singh

I am very excited to writing this review. I was suffering from infertility from last 4 years .in this period I consulted so many Doctors but didn't get any result I was very disturbed .after search I met Dr. Gawde he made me relax and suggested some life changes modifications like yoga , suryanamaskar and prescribe some medicine. And after 6 month I got my test +very. Thanks to Dr. Gawade and Dr.Deepali.

Chaitrali Kulkarni

My experience of Hysterectomy by Dr Gawade was wonderful along with post operative care and his communication skills are also good. I am happy and satisfied with pre operative consultation and Surgical technique.

FAQ

It is the procedure of choice for those with fallopian tube issues, as well as for such conditions as endometriosis, male factor infertility and unexplained infertility.

Success rates strongly depend on the age of the patient, their condition, medical history and the treatment used. We have above 75% of success rate. With accurate diagnostics and holistic approach to relieve stress can increase the chances beyond 80%.

No. The procedure is not painful as it is done under light sedation, but may cause mild discomfort. At our clinic, we use mild anesthesia administered through an IV route which relieves discomfort.

There is no evidence that travel impacts IVF pregnancy rates.

Women have a 10 to 20 percent chance of getting pregnant with each IUI cycle. The more cycles you go through, the better your chances become.

Intracytoplasmic sperm injection (ICSI) is a technique used during in vitro fertilization (IVF) where a single sperm is injected directly into the egg for the purpose of fertilization.

Ideal candidates for ICSI include men with severe infertility issues, including a low sperm count. Other candidates include men who have sperm motility issues, problems with sperm development, or a blockage that prevents sperm from being ejaculated.

Yes, alcohol can lead to infertility in both men & women.

Laparoscopy still has an important role in the diagnosis and treatment of infertility. A significant number of infertile women, such as those with a tubal factor, PCOS, and women with unexplained infertility can benefit from it.

Most women go home 2-3 days after this surgery, but complete recovery takes from six to eight weeks.

Book Appointment with
Dr. Gopalkrishna Gawade

IVF specialist & Laparoscopic gynecologist

“More than half of all infertility cases are caused by stress. Here’s how to find peace in your life. Smile. Relax. Fall in love with yourself again, because you deserve it. Let us help you through this beautiful journey to attain parenthood.