loader image

फर्टिलिटी

आटपाट नगराचा राजा अतिशय प्रजाहित दक्ष आणि प्रतापी होता. सर्व सुखे पायाशी लोळण घेत होती. असे असूनही निसंतान असल्याने राजा दुःखी होता. अशा अनेक पौराणिक गोष्टींमध्ये राजा दशरथासारख्या किंवा पांडूसारख्या निसंतान आणि हतबल राजांच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. ही हतबलता इतकी असते की श्रावणाबाळाच्या आई-बाबांचा शापसुद्धा राजा दशरथाला वरदान वाटला. “तु सुद्धा आमच्यासारखा मुलाच्या विरहात तडफडून मरशील” हा शाप खरा ठरला तर मुलांचा विरह होण्याआधी मुलं होईल तरी या विचाराने दशरथ आनंदी झाला. चक्रवर्ती सम्राट महाराज पांडू काही तरी करून आपल्याला मुल व्हावे यासाठी आपल्या प्रिय पत्नीला नियोगासाठी विनावताना हतबल झालेले दिसतात. मुल होण्यासाठी लोक किती अगतिक होतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.

निसर्ग प्रत्येक प्रजातीला जिवंत ठेवायचा आणि वाढवायचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी निसर्गाने केलेल्या योजनेत प्रजननाशी निगडीत असलेली प्रत्येक गोष्ट जीवांना आनंदच देते. प्रजननाशी निगडीत सर्व गोष्टींमध्ये मेंदूत “ऑक्सिटोसीन” हे संप्रेरक (होर्मोन) तयार होऊन मन आनंदी होते. स्री-पुरुषांच्या एकमेकांविषयीच्या आकर्षणापासून, मुलांच्या बोबड्या बोलांपर्यंत सर्व काही आनंद देते. मुले मोठे झाल्यावर त्यांच्या कर्तृत्वानेही पालकांना प्रचंड आनंद मिळतो. इतकच काय तर नातवंडही म्हातारपणात आज्जी-आजोबांचा आनंदाचा स्रोत असतात. याविरुद्ध, प्रयत्न करूनही मुलबाळ न झाल्यास प्रचंड हतबलता आणि निराशा येते. निसंतान म्हातारपणाचा विचारही लोकांना अस्वस्थ करतो.

मुलं होण्यासाठी सर्वात महत्वाचे काय असते याबाबत सांगताना आयुर्वेदाचे पितामह ऋषी चरक चरकसंहितेमध्ये एक सुत्र सांगितात,

अर्थात- गर्भधारणेसाठी आवश्यक गोष्टींचा अग्रक्रम लावल्यास “सौमनस्य्” म्हणजे “आनंदी, समाधानी आणि शांत मन” अग्रक्रम येते.
याचाच अर्थ असाही होतो कि दांपत्याची प्रजनन क्षमता त्यांच्या ताणाच्या व्यस्त प्रमाणात निगडीत असते. म्हणजे ताण जास्त, प्रजनन क्षमता कमी; ताण कमी, प्रजनन क्षमता जास्त. 

मनुष्य प्राण्यामध्ये खास करून स्त्रीमध्ये प्रजाननाचे न्युरो-होर्मोनल नियंत्रण अगदीच कडक शिस्तीने पाळले जाते. मेंदूच्या तळाला असणारा हायपोथॅलामस हा मेंदूचा भाग शरीरातील होर्मोनच्या सर्व ग्रंथींचे नियंत्रण करणाऱ्या ग्रंथिराज व { पिच्युटरी ग्रंथी (Pituitary Gland) } शी जोडलेला असतो. त्यामुळे मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या ताणताणावाचा पिच्युटरी ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या बिजवर्धक हॉर्मोन्स (FSH & LH) च्या पातळीवर दुष्परिणाम होतो. बिजवर्धक हॉर्मोन्सच्या पटली बिघडल्यावर स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया मंदावते आणि स्त्रीच्या शरीरात पुरुष हॉर्मोनची
पातळी वाढू लागते. पुरुष हॉर्मोन गर्भाशयाच्या अस्तराची वाढ थांबवते. गर्भधारणा होण्यासाठी आवश्यक वाढ न झाल्याने गर्भाशयाचे अस्तर गर्भधारणेसाठी नापीक ठरते. अशा प्रकारे ती स्त्री एका दुष्टचक्रात अडकते. प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून ताण येतो आणि ताण येतो म्हणून प्रेग्नन्सी राहत नाही. अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अपयशासोबत मनावरील ताण वाढत जातो.

आनंदी आणि निरोगी स्री पुरुष एकत्र राहत असतील तर आपोआप प्रेग्नन्सी राहते. त्यासाठी कुठलाही उपचार करावा लागत नाही. पण भारतासारख्या विकसनशील देशात मात्र वंधत्वाच प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याच कारण डार्विनच्या “बलिष्ठ अतिजिविता – survival of fittest” या सुत्रात आहे. कुठल्याही भौगोलिक क्षेत्रात लोकसंख्या वेगाने वाढली की निसर्ग ती कमी करण्याचा प्रयत्न करतो. लोकसंख्या विस्फोटानंतर जगण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू होते. ही स्पर्धा जितकी कठीण होत जाते तितका ताण वाढत जातो. ताणामुळे दोन गोष्टी होतात. एकीकडे ताणामुळे वंधत्व वाढून लोकसंख्यावाढीवर नियंत्रणात आणले जाते तर दुसरीकडे ताणतणावामुळे येणाऱ्या मधूमेह, रक्तदाब, हृदयविकार सारख्या आजारांनी लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे भारतात जसे मधूमेह, रक्तदाब आणि हृदयविकार वाढत आहेत तसेच वंधत्वही वाढत चालले आहे.

एखाद्या जोडप्याने वंधात्वाचे उपचार सुरु केले कि त्यांच्या प्रेग्नन्सीच्या अपेक्षा वाढत जातात. अपेक्षा वाढल्या कि मनावरील भीती, चिंता आणि ताण वाढत जातो. हा वाढणारा ताणाच गर्भधारणेतील मुख्य अडथळा असतो. हाच धागा पकडून सिटी फर्टीलिटी सेंटरमध्ये आम्ही उपचार करतो. उपचारासाठी आलेल्या दांपत्याचा मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली जाते. सुरवातीला साधे उपचार केले जातात. गरज पडल्यास सोबत
IUI, IVF, ICSI, Counselling(समुपदेशन)आणि Freezing सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञानही मदतीला असते. म्हणूनच आम्ही आजवर अतिशय यशस्वीपणे वंधत्व उपचार करू शकलो आहोत.

स्री जनन इंदियाचे बाहेरून आत खालील प्रमाणे प्रमुख भाग पडतात.

1) योनीमार्ग (Vagina-12-15cm),

2) गर्भाशयमुख (Cervix 2.5cm),

3 ) गर्भाशय (Uterus-5cm),

4) बीजवाहक नळ्या (Fallopian Tubes 10cm)

5) बीजांड (Ovaries)

प्रत्येक पाळीच्या पहिल्या दिवसापासून दोन्हीपैकी एका बीजांडात एक स्रीबीज वाढायला सुरूवात होते. ते साधारण 14 दिवसात पक्व होऊन फुटाण्यास तयार असते. त्याआधी बीजवाहक नळीचा शेवटचा छत्रीसारखा भाग स्रीबीज फुटण्याच्या जागी पसरतो आणि स्रीबीज फुटून बाहेर पडले की त्याला पकडून नळीच्या आतील पोकळीत ओढून घेते. स्रीबीज बीजवाहक नलिकेत पुढे 24 तास जिवंत राहते. या काळात स्त्रीबीजाला पोषण देण्यासाठी हजारो सहाय्यक पेशींची चळत स्रीबीजाभोवती असते. अशा प्रकारे निरोगी स्त्रीमध्ये दर महिन्यात एकच स्रीबीज बाहेर पडते. पण ते 24 तासच जिवंत राहते.

त्याच काळात नवरा बायको संबंध आल्यास योनीमार्गात गर्भाशय मुखाजवळ वीर्यपात होऊन तिथे कोट्यावधी शुक्रजंतू तिथे सोडले जातात. पुरुषबीजाला गर्भाशय मुखापासून गर्भवाहक नळीच्या टोकापर्यंतचा 15 ते 16 cm प्रवास पोहून करावा लागतो. स्पर्मला स्वतःच्या लांबीच्या 270 पट अंतर कापावे वागते. स्पर्म आणि माणसाच्या आकाराची तुलना केली तर माणसाला अर्धा किलो मीटर पोहावे लागेल. एवढ्या अंतरात बहुतेकांची दमछाक होते. केवळ हेल्दी पुरुषबीजे स्त्रीबीजापर्यंत पोहोचावेत अशी रचना केलेली असते. वीर्य गर्भाशयमुखाशी दोन तास राहिल्यास त्यातले सुदृढ आणि चपळ शुक्रजंतू पोहत गर्भाशयमुखाचा सर्वात मोठा अडथळा पार करून हजारोंच्या संख्येने गर्भाशयात प्रवेश करतात. गर्भाशयातून ते दोन्ही बाजूच्या बीजवाहक नलिकेत प्रवेश करतात आणि स्रीबीजाला फलित करण्याचा प्रयत्न करतात. त्रिबीजाभोवती असणाऱ्या सहाय्यक पेशींची चळत हटवण्यात सुरवातीला पोहचलेले हजारो पुरुषबीजे कामी येतात. शेवटी या पेशी हटून स्रीबीजाचा थोडा भाग उघडा पडला की एक पुरुषबीज त्रिबिजात प्रवेश करते आणि गर्भ तयार होतो. जितके जास्त पुरुषबीजे स्रीबीजापर्यंत पोहचतील तितकी स्रीबीजा भोवतीची पेशींची चळत हटवली जाण्याची आणि स्रिबिज फलित होण्याची शक्यता जास्त असते. साधारणतः २०० पुरुषबीजे स्रीबीजापर्यंत पोहचतात. स्त्रीबीज पुरुष बिजांच्या संपर्कात आल्यावर एकच पुरूषबीज स्त्रीबिजात प्रवेश करू शकतो. अशा प्रकारे एक स्त्रीबीज आणि एक पुरूषबीज एकत्र येऊन गर्भ तयार होतो.

पुरुषबीजे स्त्री जनन इंद्रीयात दोन ते तीन दिवस जिवंत राहू शकतात. त्यामुळे आठवड्यात किमान तीन वेळा संबंध आल्यास कुठल्याही क्षणी हजारो पुरुषबीजे स्त्री जनन इंद्रीयात स्रिबीजाची वाट पाहत थांबलेले असतात. महिन्यातून एकदाच बाहेर पडणारे एकमेव स्रीबीज फक्त 24 तासच जिवंत राहत असल्याने त्याची आणि पुरुषबीजांची चुकामुक टाळण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा संबंध येणे आवश्यक असते. आज कित्येक जोडप्यांमध्ये आठवड्यातील कामाचे पाच दिवस प्रचंड ताण आणि धावपळ असते. आठवड्याच्या शेवटी शनिवारी व रविवारी सुट्टी असल्याने फक्त तेव्हाच संबंध ठेवण्याची इच्छा आणि उर्जा शिल्लक राहते. त्यामुळे स्त्रीबीज आणि पुरूषबीजांची चुकामुक होऊन गर्भ राहण्याची शक्यता कमी होते. आजकाल आय टी दांपत्यामध्ये हे सर्रास घडते आहे.

स्त्रीबीज आणि पुरूषबीज एकत्र येऊन गर्भ तयार होण्याच्या प्रक्रियेला ‘फर्टिलायझेशान’ (Fertilization) असे म्हणतात. फलित स्रीबीजाला आता गर्भ असे म्हणतात. बीजवाहक नलिकेत तयार झालेला हा गर्भ गर्भाशयाकडे प्रवास सुरू करतो. गर्भवाहक नळीच्या आतील अस्तरातील पेशींना झाडूसारखे केस असतात. ते गर्भाला गर्भाशयाकडे हळूहळू झाडून नेतात. साधारण पाच ते सहा दिवसात गर्भ गर्भाशयात पोहचतो. तयार झाल्याच्या ते सहाव्या दिवशी गर्भाभोवातीचे कवच फोडून गर्भ बाहेर पडतो आणि उपलब्ध भूमीवर मूळ धरतो. कवच फोडून गर्भ बाहेर पडण्याच्या क्रियेला ‘हॅचिंग’ असे म्हणतात.

पाळीच्या सुरवातीच्या पहिल्या 14-15 दिवसात त्रीबीज पक्व होत असताना तिकडून बाहेर पडणाऱ्या इस्ट्रोजेन (Estrogen) या हॉर्मोनमुळे गर्भाशयाच्या अस्तराची वाढ होऊन ते गर्भधारणेसाठी सक्षम होत असते. स्त्रीबीज बाहेर पडल्यानंतरत्याच दिवशी गर्भ तयार होऊन पुढे सहा दिवसांनी गर्भाशयाच्या अस्तरात गर्भधारणा होते. या सहा दिवसात स्त्री बीजांडातून इस्ट्रोजेन सोबत प्रोजेस्टेरॉन (Progesterone) हे हॉर्मोन बाहेर पडत असते. हे दोन्ही हॉर्मोन्स मिळून शेवटचे सहा दिवस गर्भाशयाची वाढ करत असतात. जसा शेतकरी उन्हाळ्यात शेतीची मशागत करून आधी मातीला भुसभुशीत करतो व नंतर खत घालून माती सुपीक करतो हा तसाच प्रकार आहे. गर्भाशयाची तयारी पूर्ण होताना असा २४ तासांची असा एक दिवस येतो कि ज्या वेळी गर्भाशयाची गर्भधारण क्षमता सर्वात जास्त असते. या २४ तासांना इंप्लांटेशन विंडो (Implantation Window) असे म्हणतात. या २४ तासात गर्भाशयाच्या अस्तराच्या पेशींमध्ये गर्भधारणेसाठी आवश्यक असणारे ४८ वेगवेगळे जनुके (Genes) पूर्ण क्षमतेने काम करत असतात. गर्भाशयाच्या सुपीक झालेल्या अशा अस्तरात गर्भ पोहचतो तेव्हा त्याच्या विकासाचा सहावा दिवस आणि गर्भाशयाच्या अस्तराच्या विकासात येणारी इंप्लांटेशन विंडो एकाच दिवशी आली तरच गर्भधारणा होते. मग पाळी चुकते. गर्भधारणा झाली नाही तर स्त्रीबीज बाहेर पडल्याच्या 14 दिवसात पाळी येते. गर्भाशयाचे अस्तराच्या वरील परतींमधील पेशी रक्तासोबत पाळीच्या स्वरूपात बाहेर टाकल्या जातात. पुढील महिन्यात परत स्रीबीज आणि गर्भाशयाचे अस्तर नव्याने तयार होऊ लागते. गर्भ राहिला तर पाळी चुकते अन्यथा दर महिन्याला पाळी येत राहते.

आता गर्भ राहण्यासाठी काय काय लागते ते पाहू
1) दर महिन्याला एक स्त्रीबीज तयार झाले पाहिजे
2) तयार झालेले स्त्रीबीज फुटून बाहेर पडले पाहिजे
3) बाहेर पडलेले स्त्रीबीज गर्भावाहक नळीने झेलून पकडून ठेवले पाहिजे.
4) बाहेर पडलेले स्त्रीबीज केवळ २४ तास जिवंत राहू शकत असल्याने स्त्रीबीज जेव्हा बाहेर पडेल त्याच काळात शरीर संबंध आला पाहिजे. स्त्रीबीज आणि पुरुष बीज यांची चुकामुक झाल्यास गर्भ तयार होणे शक्य नसते.
5) पुरुष बीज स्त्री जनन इंद्रियामध्ये 2-3 दिवस जिवंत राहू शकते. त्यामुळे आठवड्यात किमान तीन शरीर संबंध आले तर महिन्यातील कुठल्याही क्षणी पुरुष बीजे स्त्री जनन इंद्रियात स्त्री बीजांची वाट पाहत थांबलेले असतील. अशा प्रकारे स्त्रीबीज आणि पुरुष बीज यांची चुकामुक टाळता येते.
6) शरीर संबंधात गर्भाशयाच्या तोंडाच्या आसपास जमा झालेले वीर्य तेथे दोन तास राहिले पाहिजे.
7) गर्भाशयाच्या तोंडाच्या आसपास जमा झालेल्या वीर्यामध्ये पुरुषबीजांची संख्या (count) योग्य प्रमाणात हवी.
8) गर्भाशयाच्या तोंडाच्या आसपास जमा झालेल्या वीर्यामध्ये पुरुषबीजांची पुढे सरकण्याची क्षमता (motility)
योग्य प्रमाणात हवी.
9) स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचा अनुवांशिक दर्जा (Quality) चांगली हवी.
10) स्रीबीज आणि पुरुषबीज भेटीचा मार्ग (योनीमार्गापासून बीजांडापर्यंत) उघडा पाहिजे.
11) गर्भ गर्भाशयात येतो त्या दिवशी गर्भाशयाचे अस्तर गर्भधारणेसाठी तयार असावे.
12) गर्भाच्या वाढीचा हा सहावा दिवस आणि गर्भाशयाच्या अस्तराच्या वाढीतील इंप्लांटेशन विंडो (implantation window ) चा दिवस एकच आला पाहिजे.

वर्षातून एकदाच संबंध येणाऱ्या चार पायावर चालणाऱ्या प्राण्यांमध्ये ही गर्भधारण क्षमता 80% असते. निसर्गाने या प्राण्यांइतकी प्रजनन क्षमता बारामाही संबंध ठेवणा-या मनुष्य प्राण्याला दिली असती तर आज पृथ्वीवर पाऊल ठेवायला जागा उरली नसती.

एका महिन्यात गर्भ राहण्याची शक्यता फक्त 20% आहे याचे भान राहिल्यास प्रत्येक महिन्यात अती अपेक्षा आणि त्यानंतर अपेक्षा भंगाने येणारी निराशा टाळता येते. उपचार घेणाऱ्या दांपत्याने या ज्ञानाचे सतत भान ठेवून उपचारा दरम्यान संयम बाळगला पाहिजे. एका महिन्यात गर्भ राहण्याची शक्यता फक्त 20% आहे याचे भान डॉक्टरांनाही ठेवावे लागते. नुकत्याच वंधत्वनिवारण उपचार सुरू करणाऱ्या दांपत्याला कमीत कमी वेळ आणि पैसा खर्च करायला भाग पाडणारे उपचार योजावे लागतात. त्यांचा जितका वेळ आणि पैसा खर्च होतो तितक्या जास्त अपेक्षा आपोआप निर्माण होतात. जितक्या जास्त अपेक्षा निर्माण होतात तितकीच अपेक्षाभंगाची भीती निर्माण होते. जितकी जास्त अपेक्षाभंगाची भीती निर्माण होते तितका मनावरचा ताण वाढत जातो. जितका ताण वाढतो तितकीच गर्भाधारणेची शक्यता कमी होत जाते. इतके प्रयत्न करुनही गर्भधारणा न झाल्याने परत ताण वाढतो. त्याने
गर्भधारणेची शक्यता आणखीच खालावते. हे दुष्टचक्र आहे.

खर्चिक उपचार –> अपेक्षा -> अपयशाची भीती –> ताण –> अपयश -> अपेक्षाभंग – -> ताण–> आणखी महागडे उपचार –> आणखी अपेक्षा –> आणखी ताण

वरील दुष्टचक्रात सापडलेले लोक लाखो रुपए खर्च करून शेवटी निराश होतात आणि एक दिवस कंटाळून उपचार बंद करतात. काही लोक मुलं दत्तक घेतात वा सांभाळण्यासाठी आणतात. आता दर महिन्याला परीक्षेला बसायचं नसल्याने त्यांच्या मनावरील ताण कमी होतो. त्यात काही लोकांना सौमनस्य प्राप्त झाल्याने काही दिवसात त्यांना स्वतःलाही गर्भधारणा होते. हे फक्त “कभी खुशी कभी गम” मध्ये घडते असे नाही. आम्हाला याची प्रचिती ब-याच वेळा आलेली आहे. पण असे प्रकार फार विरळ  घडतात. त्यामुळे उपचारांना पर्याय नसतो. पण उपचारांचा ताण कमीत कमी ठेवत उपचार केले गेले तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो असे निदर्शनात आलेले आहे. म्हणून सिटी फर्टीलिटी सेंटर मध्ये आम्ही सुरवातीचे उपचार अगदी कमीत कमी खर्चात आणि त्रासात होतील असे पाहतो. सुरुवातीच्या उपचारांना आम्ही असिस्टेड नॅचरल कनसेप्शन (Assisted Natural Conception) असे म्हणतो.

आमच्याकडे बहुतेक जणी (50%) याच उपचार पद्धतीने गर्भवती होतात. सुरवातीचे हे उपचार फेल गेल्यास पुढील टप्प्यात IUI सारखे त्यातल्या त्यात कमी खर्चीक आणि कमी त्रासदायक उपचार सुरू होतात. यात आणखी 30% स्रीया गर्भवती होतात. उरलेल्या 20% लोकांची वंधत्व समस्या गंभीर असल्याने टेस्ट ट्यूब बेबी (IVF/ICSI) या शेवटच्या उपचार पद्धतीचा सहारा घ्यावा लागतो.

IVF procedures
0 +
Surgeries
0 +
Deliveries
0 +

Our Services

We provide comprehensive care for women of all ages. Right form the reproductive issues to post-menopausal gynecologic problems, every treatment related to female reproductive organs are provided here.

Contact Detail

Address

Survey No 28, Patil Hospital, Sinhagad Road, Anand Nagar, Pune, Maharashtra 411051

Phone

+91 86699 93336

Subscribe To Our Channel

What People Say
About Us

Pallavi M

We got this reference through one of my friend, with full faith we visited the clinic for consultation. We had already taken consultation and treatment from many renowned gynecologist in Pune. Dr. Gopalkrishna Gawade Sir made us feel confident and comfortable in the first visit itself. He explained us the procedure and line of treatment.

Pooja Singh

I am very excited to writing this review. I was suffering from infertility from last 4 years .in this period I consulted so many Doctors but didn't get any result I was very disturbed .after search I met Dr. Gawde he made me relax and suggested some life changes modifications like yoga , suryanamaskar and prescribe some medicine. And after 6 month I got my test +very. Thanks to Dr. Gawade and Dr.Deepali.

Chaitrali Kulkarni

My experience of Hysterectomy by Dr Gawade was wonderful along with post operative care and his communication skills are also good. I am happy and satisfied with pre operative consultation and Surgical technique.

FAQ

It is the procedure of choice for those with fallopian tube issues, as well as for such conditions as endometriosis, male factor infertility and unexplained infertility.

Success rates strongly depend on the age of the patient, their condition, medical history and the treatment used. We have above 75% of success rate. With accurate diagnostics and holistic approach to relieve stress can increase the chances beyond 80%.

No. The procedure is not painful as it is done under light sedation, but may cause mild discomfort. At our clinic, we use mild anesthesia administered through an IV route which relieves discomfort.

There is no evidence that travel impacts IVF pregnancy rates.

Women have a 10 to 20 percent chance of getting pregnant with each IUI cycle. The more cycles you go through, the better your chances become.

Intracytoplasmic sperm injection (ICSI) is a technique used during in vitro fertilization (IVF) where a single sperm is injected directly into the egg for the purpose of fertilization.

Ideal candidates for ICSI include men with severe infertility issues, including a low sperm count. Other candidates include men who have sperm motility issues, problems with sperm development, or a blockage that prevents sperm from being ejaculated.

Yes, alcohol can lead to infertility in both men & women.

Laparoscopy still has an important role in the diagnosis and treatment of infertility. A significant number of infertile women, such as those with a tubal factor, PCOS, and women with unexplained infertility can benefit from it.

Most women go home 2-3 days after this surgery, but complete recovery takes from six to eight weeks.

Book Appointment with
Dr. Gopalkrishna Gawade

IVF specialist & Laparoscopic gynecologist

“More than half of all infertility cases are caused by stress. Here’s how to find peace in your life. Smile. Relax. Fall in love with yourself again, because you deserve it. Let us help you through this beautiful journey to attain parenthood.